हिंदी भाषेचा राष्ट्रीय आणि वैश्विक स्तरावर वापर वाढला पाहिजे_ भूषणजी पाठे : : नवगण महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा

परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला या वेळी प्रमुख पाहुणे महानिर्मितीचे उपप्रबंधक श्री भूषण सुभाष जी पाठे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे हे होते तर व्यासपीठावर  डॉ अर्चना परदेशी डॉ दयानंद कुरूडे व प्रा. परशुराम राठोड हे उपस्थित होते. 

या वेळी बोलताना श्री पाठे यांनी सांगितले की  हिंदीचा वारसा भारतीयांना अतिशय प्राचीन काळापासून लाभलेला असुन ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी येथील प्रतिभावंतांनी केली आहे त्याचे वाचन आणि उपयोजन भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि जगामध्ये देखील वाढले पाहिजे. श्री पाटे यांनी आपल्या सर्पमित्र विषय कौशल्याचे आणि पक्षी प्रेमाचे ही अनेक उदाहरणे दिली व विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले.
हिंदी विभागाच्यावतीने हिंदी दिवसानिमित्त  निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली यामध्ये कु. साक्षी चाटे ,माया कांबळे, पठाण शहेनाज  या विद्यार्थिनींनी बक्षिसे मिळविली तर काव्यवाचन स्पर्धेमध्ये  माया कांबळे, शिफा आलम, खान माजिद खान या विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळविली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ एस आर तोंडे व डॉ आर बी धायगुडे यांनी काम पाहिले. 
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ राजपांगे यांनी हिंदी भाषेच्या उपाययोजनांचे अनेक मजेशीर अनुभव सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग अध्यक्षा डॉ अर्चना परदेशी यांनी केले तर प्रस्तावना डॉ दयानंद कुरुडे यांनी केली व आभार प्रा. परशुराम राठोड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयांतील बहुसंख्य विद्यार्थी आणि सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

व्यावसायिक स्पर्धेमध्ये टिकावयाचे असेल तर काळानुसार बदलणे गरजेचे__ प्राचार्य डॉ मधुकर आघाव

आ.विक्रम काळे यांच्या हस्ते डॉ.मधुकर आघाव यांचा नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवडीबद्दल सत्कार