Posts

Showing posts from September, 2022

नवगण महाविद्यालयातील गृह विज्ञान विभाग परळी आणि महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांच्या अंतर्गत येणाऱ्या नागरी रुग्णालय परळी यांच्या वतीने ' माता सुरक्षित तर' घर सुरक्षित एक दिवसीय तपासणी शिबिर

Image
नवगण महाविद्यालयातील गृह विज्ञान विभाग परळी आणि महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांच्या अंतर्गत येणाऱ्या नागरी रुग्णालय परळी यांच्या वतीने ' माता सुरक्षित तर'  घर सुरक्षित  एक दिवसीय तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये महाविद्यालयातील किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणी मध्ये मुलींचे रक्तदाब, हिमोग्लोबिन, वयानुसार वजन आणि बी एम आय  घेण्यात आला. आणि  त्यानुसार मुलींना कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, विटामिन डी, ग्लुकोज, लोह अशा विविध औषधांचे  वाटप नागरी रुग्णालय परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले. या शिबिरासाठी  नागरी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीडॉ. घुबडे, डॉ. राजवाडे, डॉ. घुगे आणि सर्व तज्ञ स्टाफ कार्यरत होता. महाविद्यालयाच्या वतीने आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा  सत्कार करण्यात आला. गृह विज्ञान विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. वंदना फटाले, डॉ. परदेशीं, प्रा. ज्योती मुंडे, प्रा सोनाली जोशी, यांनी शिबिरासाठी यशस्वी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. बबन झाजे यांनी केले. कार्यक्रमाचे आभ...

हिंदी भाषेचा राष्ट्रीय आणि वैश्विक स्तरावर वापर वाढला पाहिजे_ भूषणजी पाठे : : नवगण महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला या वेळी प्रमुख पाहुणे महानिर्मितीचे उपप्रबंधक श्री भूषण सुभाष जी पाठे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे हे होते तर व्यासपीठावर  डॉ अर्चना परदेशी डॉ दयानंद कुरूडे व प्रा. परशुराम राठोड हे उपस्थित होते.  या वेळी बोलताना श्री पाठे यांनी सांगितले की  हिंदीचा वारसा भारतीयांना अतिशय प्राचीन काळापासून लाभलेला असुन ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी येथील प्रतिभावंतांनी केली आहे त्याचे वाचन आणि उपयोजन भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि जगामध्ये देखील वाढले पाहिजे. श्री पाटे यांनी आपल्या सर्पमित्र विषय कौशल्याचे आणि पक्षी प्रेमाचे ही अनेक उदाहरणे दिली व विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले. हिंदी विभागाच्यावतीने हिंदी दिवसानिमित्त  निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली यामध्ये कु. साक्षी चाटे ,माया कांबळे, पठाण शहेनाज  या विद्यार्थिनींनी बक्षिसे मिळविली तर काव्यवाचन स्पर्धेमध्ये  माया कां...