आ.विक्रम काळे यांच्या हस्ते डॉ.मधुकर आघाव यांचा नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवडीबद्दल सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांच्याहस्ते नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ मधुकर आघाव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    
            नवगण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये गेल्या 28 वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ मधुकर आघाव यांची नुकतीच महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी डॉ.मधुकर आघाव सर यांच्या प्राचार्यपदी नियुक्तीबद्दल पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी नगरसेवक चेतन सौदळे व इतर उपस्थितीत होते. तसेच  शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी नवगण महाविद्यालय येथे भेट दिल्याबद्दल प्राचार्य  डॉ मधुकर आघाव यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थिती होते.

Comments

Popular posts from this blog

व्यावसायिक स्पर्धेमध्ये टिकावयाचे असेल तर काळानुसार बदलणे गरजेचे__ प्राचार्य डॉ मधुकर आघाव

हिंदी भाषेचा राष्ट्रीय आणि वैश्विक स्तरावर वापर वाढला पाहिजे_ भूषणजी पाठे : : नवगण महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा