व्यावसायिक स्पर्धेमध्ये टिकावयाचे असेल तर काळानुसार बदलणे गरजेचे__ प्राचार्य डॉ मधुकर आघाव

नवगण महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न_
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज रोजी परळी पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्टर भागवत पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाणिज्य मंडळाचे व स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. त्यावेळी व्यासपीठावर डॉ मधुकर आघाव हे बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ अनुरथ चंद्रे यांनी केले तर पोस्टमास्तर भागवत पाठक यांनी पोस्ट विभागाच्या आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना आणि विद्यार्थी उपयोगी स्कीम ची माहिती दिली विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी पोस्टाच्या शेकडो स्कीमची माहिती घेण्यासाठी पोस्टात यावे आणि त्याचा लाभ उठवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे यांची ही उपस्थिती होती कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना डॉ आघाव म्हणाले की आज मार्केटमध्ये बी एस एन एल ला तुलनेने कमी ग्राहक आहेत मात्र पोस्ट ऑफिस अजूनही टिकून आहे याचे कारण ते काळानुसार बदलले आहे कोणत्याही व्यावसायिक स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर नवीन तंत्रज्ञान व ग्राहकांची मागणी यानुसार काळाची पावले ओळखली पाहिजेत व स्वतःमध्ये बदल केला पाहिजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राहुल सोनवणे यांनी केले तर आभार डॉ रवींद्र मचाले यांनी व्यक्त केले कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आ.विक्रम काळे यांच्या हस्ते डॉ.मधुकर आघाव यांचा नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवडीबद्दल सत्कार

हिंदी भाषेचा राष्ट्रीय आणि वैश्विक स्तरावर वापर वाढला पाहिजे_ भूषणजी पाठे : : नवगण महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा