नवगण महाविद्यालयातील प्राध्यापकाने मिळविले मिलियन विह्यू
प्रतिनिधी : परळी वैजनाथ येथील नवगण महाविद्यालयामध्ये मराठीचे अध्यापन करणारे प्राध्यापक डॉ. बापू घोलप यांनी विद्यावार्ता नावाचे शैक्षणिक यूट्यूब चॅनल तयार करून त्यावर अभ्यासक्रमाचे व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि त्याला तब्बल एक मिलियनपेक्षा जास्त विद्यार्थी /प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे.
महाराष्ट्र शासनाने पुढील महिन्यापासून गुगल क्लासरूमवर ऑनलाइन शाळा सुरू करण्याचे ठरविले आहे मात्र त्यापूर्वीच सहा महिन्यांपासून परळी येथील डॉ. घोलप ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत. मराठी हा विषय असूनही देशभरामध्ये त्यांचे मराठी कवितेचे अध्ययन-अध्यापन, व्यक्तिमत्त्व विकास विषयक आणि सूत्रसंचालन याविषयीचे व्हिडिओ पाहिले जात आहेत.
शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे विद्यावार्ता व्हिडिओ https://goo.gl/dk5tXx या लिंकवर मोफत पाहता येतात. "प्रत्येक शिक्षकाकडे शिकविण्याचे विशेष कौशल्य असते, त्यांच्या विषयाचे ज्ञान असते ते विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचविण्याची या कोरोना लॉगडाऊनमुळे गुगलने चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे" असे मत डॉ. घोलप यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.
१०वी / १२ वी नवीन अभ्यासक्रम, बदललेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, यूजीसीचे निर्णय, परीक्षा संबंधीची चर्चा याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, भाषणे आणि वैचारिक चर्चा ही त्यांनी विद्यावार्ता यूट्यूब वर केलेली दिसून येते. गुगलवर किंवा युट्यूबवर vidyawarta सर्च केले असता क्रमांक एकवर अर्थात रँकिंगमध्ये त्यांचे व्हिडिओ येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ग्रामीण भागातील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनीही निश्चितच या इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा लाभ घ्यावा व आपल्या काही समस्या असल्यास कॉमेंट्समध्ये विचाराव्यात असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या शिक्षणाविषयी सर्वत्र चर्चा चालू असताना विद्यावार्ता हा किवर्ड सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे अशा हरहुन्नरी आणि शिक्षणप्रेमी चळवळ करणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
*Research Journal Details*
https://youtube.com/shorts/grDycZEpgcs?si=n6aAEnvQF0NhGH8l
*ISBN Book Publication Details*
https://youtube.com/shorts/B1O_Q8bExdg?si=Zej2cxRwqNujc0df
*Innovative Award Details*
https://youtube.com/shorts/LKMtq78YZ-U?si=Akt0t3V992KsBGYc
*Ph.D. Thesis Details*
https://youtube.com/shorts/NbQn4V_6-T4?si=dfxLakSB66y6418v
*Imp interactions*
https://youtube.com/shorts/K7hXReA_PBA?si=LRAoxe-tSNG-82Wp
*Edited Book Details*
https://youtube.com/shorts/eV6FcR2_OKE?si=12E_Prs6PKQ1qv2I
*Editor*
7588057695
8788575711
vidyawarta@gmail.com

Comments
Post a Comment