Posts

व्यावसायिक स्पर्धेमध्ये टिकावयाचे असेल तर काळानुसार बदलणे गरजेचे__ प्राचार्य डॉ मधुकर आघाव

Image
नवगण महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न_ परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज रोजी परळी पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्टर भागवत पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाणिज्य मंडळाचे व स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. त्यावेळी व्यासपीठावर डॉ मधुकर आघाव हे बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ अनुरथ चंद्रे यांनी केले तर पोस्टमास्तर भागवत पाठक यांनी पोस्ट विभागाच्या आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना आणि विद्यार्थी उपयोगी स्कीम ची माहिती दिली विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी पोस्टाच्या शेकडो स्कीमची माहिती घेण्यासाठी पोस्टात यावे आणि त्याचा लाभ उठवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे यांची ही उपस्थिती होती कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना डॉ आघाव म्हणाले की आज मार्केटमध्ये बी एस एन एल ला तुलनेने कमी ग्राहक आहेत मात्र पोस्ट ऑफिस अजूनही टिकून आहे याचे कारण ते काळानुसार बदलले आहे कोणत्याही व्यावसायिक स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर नवीन तंत्रज्ञान व ग्रा...

आ.विक्रम काळे यांच्या हस्ते डॉ.मधुकर आघाव यांचा नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवडीबद्दल सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांच्याहस्ते नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ मधुकर आघाव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.                 नवगण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये गेल्या 28 वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ मधुकर आघाव यांची नुकतीच महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी डॉ.मधुकर आघाव सर यांच्या प्राचार्यपदी नियुक्तीबद्दल पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी नगरसेवक चेतन सौदळे व इतर उपस्थितीत होते. तसेच  शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी नवगण महाविद्यालय येथे भेट दिल्याबद्दल प्राचार्य  डॉ मधुकर आघाव यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थिती होते.