नवगण महाविद्यालयातील गृह विज्ञान विभाग परळी आणि महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांच्या अंतर्गत येणाऱ्या नागरी रुग्णालय परळी यांच्या वतीने ' माता सुरक्षित तर' घर सुरक्षित एक दिवसीय तपासणी शिबिर
नवगण महाविद्यालयातील गृह विज्ञान विभाग परळी आणि महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांच्या अंतर्गत येणाऱ्या नागरी रुग्णालय परळी यांच्या वतीने ' माता सुरक्षित तर' घर सुरक्षित
एक दिवसीय तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये महाविद्यालयातील किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणी मध्ये मुलींचे रक्तदाब, हिमोग्लोबिन, वयानुसार वजन आणि बी एम आय घेण्यात आला. आणि त्यानुसार मुलींना कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, विटामिन डी, ग्लुकोज, लोह अशा विविध औषधांचे वाटप नागरी रुग्णालय परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले. या शिबिरासाठी नागरी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीडॉ. घुबडे, डॉ. राजवाडे, डॉ. घुगे आणि सर्व तज्ञ स्टाफ कार्यरत होता. महाविद्यालयाच्या वतीने आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. गृह विज्ञान विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. वंदना फटाले, डॉ. परदेशीं, प्रा. ज्योती मुंडे, प्रा सोनाली जोशी, यांनी शिबिरासाठी यशस्वी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बबन झाजे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. कुरुडे यांनी केले
या शिबिराचे महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनींनी लाभ घेतला. याचबरोबर परिसरातील माता गरोदर माता, रक्तक्षय स्त्रिया यांना सुद्धा या शिबिराचा लाभ मिळाला.
Comments
Post a Comment